ANIL KAPOOR'S BETA FILM
Esakal
ANIL KAPOOR MADHURI DIXIT BETA FILM BOX OFFICE COLLECTION: बॉलिवूडमध्ये एकेकाळी माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांची जोडी प्रचंड हिट होती. दोघांचे प्रत्येक सिनेमे सुपरहिट व्हायचे. त्यातील एक म्हणजे 'बेटा'. 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला जवळपास ३४ वर्ष पुर्ण झाली आहेत. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. परंतु या सिनेमात सुरुवातीला माधुरीची नाहीतर श्रीदेवीची निवड झाली होती. परंतु श्रीदेवींनी नकार दिल्यामुळे माधुरीला हा सिनेमा करण्याची संधी मिळाली. परंतु माधुरी काम करणार हे कळल्यावर अनिल कपूर प्रचंड संतापले होते.