अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची बरीच चर्चा असते. लग्न झाल्यापासून अंकिता लोखंडची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होताना पहायला मिळते. दरम्यान आता या जोडप्यांच्या घरी पाळणा हालणार आहे. याचे संकेत स्वत: अंकिता लोखंडेने ऑनस्क्रीन दिले आहे. 'लाफ्टर शेफ्स 2' चा एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये बोरकूटवरुन झालेल्या भांडणात अंकिता प्रेग्नेंट असल्याचं सर्वांसमोर सांगते आणि गालातल्या गालात हसते.