Pavitra Rishta : 'मानवशिवाय अर्चना असूच शकत नाही'; मालिकेला १५ वर्षं पूर्ण झाल्यावर अंकिताची खास पोस्ट, सुशांतसाठी म्हणाली...

अभिनेत्री अंकिता लोखंडे पवित्र रिश्ता मालिकेला १५ वर्षं पूर्ण झाल्यानिमित्ताने खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.
Pavitra Rishta
Pavitra RishtaEsakal

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची मुख्य भूमिका असलेली 'पवित्र रिश्ता' ही मालिका खूप गाजली. एकता कपूरची निर्मिती असलेल्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेला प्रसारित होऊन नुकतीच १५ वर्षं पूर्ण झाली. याबद्दल अंकिताने सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट शेअर केलीये.

अंकिताची पोस्ट

मालिकेला १५ वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त अंकिताने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली त्यात ती म्हणते," ही फक्त अर्चना ही भूमिका साकारण्याचा १५ वर्षं झाली नाहीयेत तर अर्चना आणि मानव या जोडप्यातील प्रेम, लग्न, समजूतदारपणा आणि सहजीवन हे साकारुनही १५ वर्षं झाली आहेत. ते खूप परफेक्ट आहेत. आपण हल्ली जे 'गोल्स' म्हणतो ना ते ते आहेत. त्यांनी मला परफेक्ट लग्न म्हणजे काय हे शिकवलं. माझी खात्री आहे कि अर्चना आणि मानव इतकं ऑनस्क्रीन परफेक्ट जोडी कुणी असूच शकत नाही आणि याचं सगळ्यात जास्त श्रेय जात ते या मालिकेच्या प्रेक्षकांना ज्यांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं. आणि अर्थात, आम्ही ती जादू करू शकलो कारण एकता मॅडमचा आमच्यावर विश्वास होता. मानवने अर्चनाला पूर्ण केलं. जेव्हा जेव्हा अर्चनाचं नाव घेतलं जाईल तेव्हा तेव्हा मानवचीही लोकं आठवण काढतील कारण त्यांचा 'पवित्र रिश्ता' तितकाच पवित्र होता जितका 'पवित्र रिश्ता' माझा तुमच्यासोबत जोडला गेलाय. त्याच्या मार्गदर्शनाशिवाय आज मी जी काही आहे ते बानू शकले नसते. मानवशिवाय अर्चना असूच शकत नाही. जितकं हे माझं सेलिब्रेशन आहे तितकंच हे त्याचंही आहे. तू जे काही मिळवलंस, जी काही तुझी अभिनयक्षमता आम्हाला दाखवलीस त्यासाठी आम्हाला तुझा अभिमान वाटतो. आणि लक्षात ठेवा, 'आसमान में जब तक सितारे रहेंगे, हम एक दूसरे के सहारे रहेंगे। नजदीकियां या हो दूरियाँ बस प्यार ही रहेगा दरमियाँ... पवित्र रिश्ता कायमच स्मरणात राहील.
We miss you #Sushant"

या पोस्टबरोबर तिने तिचे आणि सुशांतचे काही खास सीन्स शेअर केले आहेत.

चाहत्यांच्या कमेंट्स

अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत त्यांनाही सुशांतची आठवण येते असं सांगितलं. तर काहींनी अजूनही ते मालिका पाहतात असा खुलासा केला. तर काहींनी सुशांतच्या काही खास आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या.

Pavitra Rishta
Sushant Singh Rajput: सुशांतच्या बहिणीचा मोठा दावा, अभिनेत्याच्या मृत्यूबाबत सीबीआय करणार मोठे खुलासे

२००९ साली एकता कपूरची निर्मिती असलेली पवित्र रिश्ता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. अंकिता लोखंडे, सुशांत सिंह राजपूत, सविता प्रभुणे, उषा नाडकर्णी यांची या मालिकेत मुख्य भूमिका होती. अर्चना आणि मानव या जोडप्यातील प्रेम आणि त्यांचा संसार याची ही गोष्ट होती.

सुशांतने ही मालिका अर्धवट सोडली आणि नंतर तो बॉलिवूडमध्ये त्याचं नशीब आजमावण्यासाठी गेला. २०२० मध्ये सुशांतने डिप्रेशनमुळे आत्महत्या केली.

Pavitra Rishta
Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com