ANKITA LOKHANDE TROLLED
esakal
ANKITA LOKHANDE ABU DHABI MOSQUE VISIT: अभिनेत्री अंकिता लोखंडे ही हिंदी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते. काही दिवसांपूर्वी अंकिता पती विकीसोबत गोशाळेत गेली होती. तिथं तिने गायींची सेवा करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. नेटकऱ्यांनी त्यावेळी तिचं कौतूक सुद्धा केलं. परंतु आता अंकिता चांगलीच ट्रोल होतेय. तिने सोशल मीडियावर मशिदीमधला फोटो पोस्ट केलाय. यात तिने हिजाब घातला असून नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलय.