

Entertainment News: 'बिग बॉस मराठी ५' मधून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करणारी लोकप्रिय इन्फ्लुएन्सर म्हणजे अंकिता प्रभू वालावलकर. 'बिग बॉस मराठी ५' संपल्यावर ती सुरज चव्हाणला देखील भेटायला गेली होती. अंकिता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिने इंस्टाग्राम पोस्ट करत याबद्दल माहिती दिली होती. ती संगीत दिग्दर्शक कुणाल भगतशी फेब्रुवारी महिन्यात लग्नगाठ बांधणार आहे. दोघेही सध्या त्यांच्या लग्नाच्या तयारीला लागलेत मात्र अशातच एका व्हिडिओवर अंकिताने दिलेलं उत्तर चर्चेचा विषय ठरलाय.