
छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस मराठी' या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय रीलस्टार सुरज चव्हाण याचा 'झापूक झुपूक' हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी ठीक ठाक प्रतिसाद दिला. चित्रपट चांगला असूनही त्याला म्हणावा तास प्रतिसाद लाभलेला दिसत नाहीये. त्यात सुरज चव्हाणचे ट्रोलर्स त्याचा चित्रपट पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत असं केदार शिंदे यांनी म्हटलं होतं.आता कोकण हर्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिने 'झापूक झुपूक' चित्रपटावर भाष्य केलंय.