बिग बॉस मराठीच्या अंतिम सामन्यात केदार शिंदे यांनी मोठी घोषणा केली होती. सूरज चव्हाणला विजेता घोषित केल्यावर त्यांनी सुरजसोबत नवीन चित्रपट करण्याचं जाहिर केलं होतं. याशिवाय त्या सिनेमाचं नाव 'झापुक झुपूक' असेल असंही ते म्हणाले होते. दरम्यान आता या चित्रपटाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात सुरज चव्हाणचा जीवनप्रवास पहायला मिळणार आहे.