
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा अभिनेता म्हणजे अंकुश चौधरी. त्याने मराठी सिनेसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. या वाढदिवसाला अंकुशने तब्बल तीन नवीन चित्रपटांचे पोस्टर शेअर केले. काही दिवसांपूर्वीच अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री जाहीर झाला. त्यानिमित्ताने अंकुशने त्यांच्या पहिल्या एकत्र काम केलेल्या चित्रपटाचा फोटो शेअर केला. अनेकांना हा चित्रपट ओळखता आलेला नाही. तुम्हाला ठाऊक आहे का हा चित्रपट कोणता आहे ते?