
Marathi Entertainment News : ‘१९२० इव्हल रिटर्न’, ‘रागिणी एमएमएस २’ आणि ‘अलोन’ यांसारख्या सुपरहिट हॉरर-थ्रिलर चित्रपटांच्या यशस्वी दिग्दर्शनानंतर भूषण पटेल यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. ‘पी.एस.आय.अर्जुन’ हा त्यांचा पहिला चित्रपट आहे. त्यांच्या या चित्रपटात महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरी याने मुख्य भूमिका साकारली असून डॅशिंग लूकमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाचे दमदार डायलॉग्स सोशल मीडियावर चांगलेच ट्रेंडिंगमध्ये आहेत.