

छोट्या पडद्यावरील मालिका या घराघरात मोठ्या आवडीने पाहिल्या जातात. त्यात काही मालिका प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात तर काही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतात. मालिकांमधील पात्रही प्रेक्षकांची आवडती बनतात. अशीच एक छोट्या पडद्यावरील मालिका प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतेय ती म्हणजे 'लक्ष्मीच्या पावलांनी'. या मालिकेने गेले महिनाभर टीआरपी यादीत पहिला क्रमांक मिळवला होता. मात्र आता मालिकेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मालिकेतील एका अभिनेत्रीने मालिकेला रामराम ठोकलाय.