

celina jaitely
ESAKAL
'गोलमाल रिटर्न्स', 'अपना सपना मनी मनी' अशा अनेक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री सेलिना जेटली हीचा १५ वर्षांचा संसार मोडला आहे. सेलिनाने तिचा पती पीटर हागवर घरघुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. तिने पीटरकडून घटस्फोटाची मागणी केली आहे. अभिनेत्रीने पती विरोधात मुंबई न्यायालयात केस दाखल केली असून तिने न्यायाची मागणी केली आहे. सेलिनाच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान कोर्टाने ऑस्ट्रियाचा नागरिक पीटर हागला नोटीस पाठवली आहे. सेलिनाने पीटरवर कौटुंबिक हिंसाचार, क्रूरता, शारिरीक, मानसिक छळाचे आरोप केलेत.