
छोट्या पाड्यावर गेल्या काही महिन्या अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. आता ऑगस्ट महिना तर मनोरंजनाचा महामास म्हणायला हवा. कारण या महिन्यात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ११ तारखेपासून झी मराठीवर 'तारिणी' आणि 'वीण दोघातली ही तुटेना' या दोन मालिका सुरू होणार आहेत. तर काही दिवसांनी १५ ऑगस्ट पासून स्टार प्रवाहवर 'लपंडाव' ही मालिका सुरू होणार आहे. त्यासोबतच झी मराठीवर 'नागीण' ही मालिका सुरू होणार आहे. या मालिकेची तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र आता झी मराठीला तोड देण्यासाठी स्टार प्रवाहने आणखी एका नवीन मालिकेची घोषणा केलीये.