
STAR PRAVAH NEW SERIAL
ESAKAL
गेल्या काही महिन्यात छोट्या पडद्यावर अनेक नवीन मालिका सुरू झाल्या. या नव्या मालिकांसाठी काही जुन्या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. तर काही मालिकांची वेळ बदलण्यात आली. यातील काही नवीन मालिका झी मराठीवर सुरू झाल्या. तर काही स्टार प्रवाहवर. यातील स्टार प्रवाहवर दोन मालिका अगदी कालपासून म्हणजेच १५ सप्टेंबरपासून सुरू झाल्या. 'लपंडाव' या मालिकेत रुपाली भोसले, चेतन वडनेरे आणि कृतिका राव मुख्य भूमिकेत आहेत. तर 'नशीबवान' मालिकेत आदिनाथ कोठारे, नेहा नाईक आणि अजय पुरकर मुख्य भूमिकेत आहेत. अशातच आता स्टार प्रवाहवर नव्या मालिकेची घोषणा करण्यात आलीये.