
Bollywood Entertainment News : सध्या अनेक जुने सिनेमे पुन्हा रिलीज होत आहेत. तुंबाड, कुछ कुछ होता है, कल हो ना हो, करण अर्जुन असे अनेक सिनेमे या काळात रिलीज झाले. पण आता एक 22 वर्षं रिलीजपासून रखडलेला सिनेमा पुन्हा रिलीज होतोय. दिग्दर्शक अनुराग कश्यपचा हा पहिला सिनेमा आहे. या सिनेमाचं नाव आहे पाँच. पुण्यात घडलेल्या एका भयानक हत्याकांडावर आधारित हा सिनेमा आहे.