
२०२५ च्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जेतेपद पटकावलं. या विजयासाठी क्रिकेटपटू विराट कोहली तब्बल १८ वर्ष वाट पाहत होता. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि विराटचे चाहते प्रचंड आनंदी झाले. विराटने पत्नी अनुष्का शर्मासोबत मैदानात तो क्षण सेलिब्रेट केला. या विजयामुळे केवळ विराटचं नाही तर त्याच्या कुटुंबीयांचा आनंदही अनावर झाला. त्यातच विराटची बहीण भावना कोहली धिंग्रा हिनेदेखील इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. आणि विराटचं खूप कौतुक केलं. मात्र तिच्या पोस्टवर एका नेटकऱ्याने ती विराट आणि अनुष्कासाठी महत्वाची नाहीये असं म्हटलं. त्यावर भावनाने दिलेलं उत्तर आता चर्चेचा विषय ठरतंय.