

anushree mane
ESAKAL
'बिग बॉस मराठी ६' मध्ये दररोज नवनवीन राडे पाहायला मिळतायत. घरात आलेल्या १७ स्पर्धकांमधील एकही स्पर्धक या आठवड्यात घराबाहेर झाला नाही. मात्र येत्या आठवड्यात घरातील व्यक्तींवर एलिमिनेशनची तलवार असणार आहे. अशातच आता अनुश्री माने आणि रुचिता जामदार यांनी राकेश बापटवर केलेले आरोप सद्य चर्चेचा विषय बनलेत. अनुश्री आणि रुचिता यांनी राकेशने तिला मुद्दाम हात लावला असा आरोप केला. ज्यामुळे राकेश संतापलाय. मात्र राकेशवर आरोप करणारी अनुश्री वर्षभरापूर्वी तिच्या ब्रेकअप मुळे चर्चेत आली होती. कोण होता तिचा बॉयफ्रेंड? आणि का रंगलेली तिच्या ब्रेकअपची चर्चा?