bigg boss marathi 6

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला कार्यक्रम बिग बॉस मराठी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. 'बिग बॉस मराठी' चा सहावा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या सीझनमध्ये कोण कोण पाहायला मिळणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. नुकताच 'बिग बॉस मराठी ६' चा पहिला प्रोमो समोर आलाय. या सीझनच्या प्रोमोमध्ये सुरुवातीला अनेक दरवाजे दाखवण्यात आले. त्यानंतर स्वर्गाचा दरवाजा आणि नंतर नरकाच्या दरवाजा दाखवण्यात आला. याचाच अर्थ यावेळेस स्वर्ग आणि नर्क ही थीम असणार आहे. बिग बॉस मराठी सीझन 6 चा प्रोमो रिलीज होताच अनेक स्पर्धकांची नाव चर्चेत आली आहेत.
Marathi News Esakal
www.esakal.com