गेल्या काही काळापासून चित्रपटसृष्टीपासून दूर असलेले प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांनी अखेर त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केलीय. सोमवारी म्हणजे 30 जून रोजी त्यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक भन्नाट पोस्ट शेअर करत चाहत्यांना धक्काच दिला. त्यांची पोस्ट पाहून सोशल मीडियावर 'आपना सपना मनी मनी'चा सिक्वल येतोय का? अशा चर्चा रंगताना दिसताय.