'एप्रिल मे ९९'मधील ‘समर हॅालिडे’ गाणे प्रदर्शित बोमन इराणी यांची विशेष उपस्थिती

April May 99 New Song Out : बोमन इराणी यांच्या उपस्थितीत एप्रिल मे 99 सिनेमाचं समर हॉलिडे हे गाणं प्रदर्शित झालं. जाणून घेऊया या सिनेमाविषयी आणि गाण्याविषयी.
April May 99 New Song Out
April May 99 New Song Outesakal
Updated on

Marathi Entertainment News : उन्हाळ्याच्या सुट्टीची नोस्टालजिक सफर घडवणारा ‘एप्रिल मे ९९’ येत्या १६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान या चित्रपटातील उन्हाळ्याची सुट्टी अधिक रंगतदार करणारे 'समर हॅालिडे’ गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हा चित्रपट ज्याप्रमाणे प्रेक्षकांना नोस्टालजिक करणार आहे, अगदी त्याला साजेसे असे या गाण्याचे लाँचिंग करण्यात आले. माटुंग्यातील रुईया महाविद्यालयाजवळील 'डीपीज' या अतिशय प्रसिद्ध अशा ठिकाणी हा शानदार सोहळा संपन्न झाला. यावेळी आर्यन मेंगजी (कृष्णा), श्रेयस थोरात (प्रसाद), मंथन काणेकर (सिद्धेश) आणि साजिरी जोशी (जाई) यांनी चित्रपटातील गाण्यांवर नृत्य सादर केले तर भूमी प्रधान, रोहन गोखले, रोहन प्रधान यांनी 'समर हॉलिडे' हे गाणे गायले. यावेळी बोमन इराणी यांनी कलाकारांचे कौतुक करत संपूर्ण टीमसोबत मनमुराद गप्पा मारल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com