
Marathi Entertainment News : उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली असून ही सुट्टी अधिक कुल करण्यासाठी धमाल-मस्तीने भरलेला ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट येत्या २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मापुस्कर ब्रदर्सच्या या आगामी चित्रपटाचा धमाल ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून ‘थ्री इडियट्स’च्या टीमने म्हणजेच प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी, आर. माधवन, शर्मन जोशी यांच्यासह महाराष्ट्राचा लाडका भाऊ रितेश देशमुख यांनी आपल्या सोशल मीडियावरून हा ट्रेलर शेअर करत या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. ट्रेलरमध्ये मैत्री, भावनांची गुंफण आणि नात्यांची गोडी अनुभवायला मिळत आहे.