
Marathi Entertainment News : अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सध्या तिच्या प्रेमाची गोष्ट या मालिकेमुळे चर्चेत आहे. या मालिकेत ती साकारत असलेली सावनीची व्यक्तिरेखा सगळ्यांनाच पसंत पडतेय. मध्यंतरी अपूर्वाची एक मुलाखत खूप गाजली होती ज्यात तिने तिचा घटस्फोट, घरातील सदस्यांच्या निधनाचा तिच्या आयुष्यावर झालेला परिणाम यावर ती भरभरून बोलली होती. नुकतीच अपूर्वाने तिच्या भावाच्या आणि वडिलांच्या आठवणीत एक भावूक पोस्ट शेअर केली.