

A R RAHMAN
ESAKAL
आपल्या आवाजाने, गायिकीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा लोकप्रिय संगीतकार, गायक ए आर रहमान याने बॉलीवूडला अनेक हिट गाणी दिली. फक्त भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्याचे कोट्यवधी चाहते आहेत. त्याचा आवाज आणि त्याचं संगीत ऐकणं ही श्रोत्यांसाठी एक पर्वणी असते. ए आर रहमान याचं आधीचं नाव दिलीप कुमार राजगोपालन होतं. मात्र त्याने नंतर त्याचा धर्म बदलून इस्लाम धर्म स्वीकारला. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्यासाठी सुफीवादाची व्याख्या नेमकी काय आहे आणि त्याला धर्माबद्दल कोणत्या गोष्टी आवडत नाहीत याबद्दल सांगितलंय.