Aranmanai 4 Twitter Review: कुणी म्हणालं, 'ब्लॉकबस्टर' तर कुणी म्हणालं, 'जबरदस्त VFX'; तमन्नाच्या 'अरनमनई 4'नं जिंकली नेटकऱ्यांची मनं

Aranmanai 4 Twitter Review: अनेक प्रेक्षकांनी 'अरनमनई 4' या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला. काही नेटकऱ्यांनी या चित्रपटाचा रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Aranmanai 4 Twitter Review
Aranmanai 4 Twitter ReviewESAKAL

Aranmanai 4 Twitter Review: प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटियाचा (Tamannaah Bhatia) अरनमनई 4 (Aranmanai 4) या हॉरर-कॉमेडी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. अरनमनई 4 या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत होते. अशातच आता हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. अनेक प्रेक्षकांनी या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला. काही नेटकऱ्यांनी या चित्रपटाचा रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर केला आहे. जाणून घेऊयात तमन्नाच्या अरनमनई 4 या चित्रपटाच्या ट्विटर रिव्ह्यू....

अरनमनई 4 पाहिल्यानंतर काय म्हणाले नेटकरी?

एका नेटकऱ्यानं अरनमनई 4 या चित्रपटाचा रिव्ह्यू ट्विटरवर शेअर केला आहे. या रिव्ह्यूमध्ये त्यानं लिहिलं, "ब्लॉकबस्टर अलर्ट! तमन्नाच्या अभिनयानं मनं जिंकली आहेत." तर दुसऱ्या युझरनं ट्वीटमध्ये लिहिलं, "जबरदस्त VFX, चांगला स्क्रिनप्ले आणि उत्तर BGM सुंदर सी यांचा अप्रतिम चित्रपट!"

"चित्रपटातील संगीत, व्हिज्युअल, सीजी यांसारखे तांत्रिक घटक मागील अरमनई चित्रपटांच्या तुलनेत चांगले आहेत. प्री-इंटरव्हल हॉरर सीन्स चांगले आहेत आणि चित्रपटाची शेवटची 40 मिनिटे चांगली आहेत.", असंही एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं आहे.

Aranmanai 4 Twitter Review
Aranmanai 4 Trailer Out: हॉरर आणि कॉमेडीचा तडका! तमन्नाच्या 'अरनमनई 4' चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

अरनमनई या फिल्म सीरिजचा पहिला चित्रपट 2014 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात हंसिका मोटवानी, विनय राय, सुंदर आणि अँड्रिया जेरेमिया मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचा दुसरा भाग 2016 मध्ये रिलीज झाला होता. त्यात सुंदर, हंसिका मोटवानी, सिद्धार्थ आणि त्रिशा दिसले. तसेच या चित्रपटाचा तिसरा भाग 2021 मध्ये रिलीज झाला होता. ज्यामध्ये सुंदर, राशि खन्ना आणि एंड्रिया जेरेमिया यांनी काम केले होते. आता या चित्रपटाचा चौथा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com