
मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. ती 'होणार सून मी या घरची' मधून घराघरात पोहोचली. त्यात तिने जान्हवी बनून प्रेक्षकांच्या मनात घर केलं तर 'प्रेमाची गोष्ट' मध्ये तिने मुक्ता बनून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आता ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी तयार आहे. ती झी मराठीवरील 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत स्वानंदीची भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेचा लॉन्च इव्हेंट पार पडला. त्यात सुबोध आणि तेजश्री यांना लग्नातील पत्रिकेबद्दल प्रश्न विचारण्यात आले.