अरिजीत सिंह यांच्या गाण्यातून अनेकांचं प्रेम जुळलं तर अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. प्रेमाची आणि विरहाची गाणी गाणाऱ्या अरिजीत सिंह याचे चाहते देशातच नाहीतर जगभरात आहेत. आज लहान मुलापासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येक जण अरिजीत सिंह याला ओळखतं. त्याच्या गाण्याचे लाखो चाहते आहेत. परंतु स्वत: अरिजीत सिंह त्याच्या लव लाईफमुळे दु:खी होता. परंतु त्याची लहानपणीची मैत्रिण त्याचा आधार बनली.