
बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर याचा 40 वा वाढदिवस आहे. त्याने त्याच्या आयुष्यात अनेक गोष्टींचा सामना केला. 1996 मध्ये अर्जून कपूरचे वडील बोनी कपूर आणि आई मोना शौरी यांचा घटस्फोट झाला. तेव्हा अर्जुन अवघा 10 वर्षांचा होता. त्याच वर्षी बोनी कपूरने श्रीदेवीशी दुसरे लग्न केलं. अर्जुनवर याचा घटस्फोटाचा विपरीत, मानसिक परिणाम झाला. तो डिप्रेशनमध्ये गेला, त्याचं वजन वाढलं, आणि तो एकटाच रहायला लागला.