

ARUNA IRANI
ESAKAL
ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी ‘बेटा’, ‘फर्ज’, ‘रॉकी’, ‘बॉबी’ व ‘लव्ह स्टोरी’ अशा गाजलेल्या चित्रपटात काम केलंय. त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलंय. मात्र त्यांच्या चित्रपटांसोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची देखील चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा झाली. त्याचं कारण म्हणजेच त्यांचं लग्न. अरुणा यांनी एका विवाहित व्यक्तीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. झूमला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या या निर्णयाबद्दल स्पष्ट मत मांडलं.