
लोकप्रिय युट्युबर आणि इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर तिच्या व्हिडिओंमधून घराघरात पोहोचली. मात्र तिला खरी लोकप्रियता मिळाली ती 'बिग बॉस मराठी ५' मधून टॉप ५ पर्यंत पोहोचलेली अंकिता प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली. तिच्यावरच प्रेक्षकांचं प्रेम अजूनही तसंच आहे. अंकिता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिचा विवाहसोहळा कोकणातील देवबाग येथे होणार आहे. नुकताच त्यांचा मेहंदीचा सोहळा पार पडला. कुणाल आणि अंकिताचे पाहुणेदेखील या कार्यक्रमाला पोहोचलेत. मात्र 'बिग बॉस मराठी ५' फेम आर्या जाधव या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाहीये.