ARYAN KHAN
esakal
THE BADS OF BOLLYWOOD SEASON 2 SHOOTING LIKELY TO BEGIN IN MARCH: बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने दिग्दर्शनात पदार्पण केल्यानंतर आता त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल चर्चा सुरू झाली आहे. आर्यनच्या ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या सीरिजला मिळालेल्या प्रतिसादानंतर निर्माते दुसऱ्या सीझनच्या तयारीला लागल्याची माहिती समोर आली आहे. यंदा त्याने दिग्दर्शनासोबत लेखनाची सुद्धा जबाबदारी सांभाळल्याचं बोललं जातय.