मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे 22 सप्टेंबर 2020 रोजी 83 व्या वर्षी निधन झालं. कोरोना झाल्यामुळे आढळल्याने त्यांना महाराष्ट्रातील साताऱ्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आशालताजींचे कुटुंबीय मुंबईत राहत असल्याने ते साताऱ्याला पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे अभिनेत्री अलका कुबल यांनीच आशालताजींवर अंत्यसंस्कार केले.