

ASHISH PAWAR ON BHUSHAN KADU
esakal
'कॉमेडी एक्सप्रेस' मधून घराघरात पोहोचलेले मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते भूषण कडू आणि आशिष पवार यांनी एक काळ गाजवला. हे दोघे मंचावर आले की लाफ्टर फिक्स होते. प्रेक्षक त्यांची आतुरतेने वाट पाहायचे. 'कॉमेडी एक्सप्रेस' मधलं त्यांचं शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं स्किट चांगलंच गाजायचं. येत्ते दोघेही शाळेतल्या वात्रट मुलांचं काम करायचे. या दोघांची जोडी तेव्हा प्रचंड गाजलेली. मात्र गेल्या काही वर्षात भूषण कडू अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. भूषण कोणत्याही प्रोजेक्टमध्ये दिसलेला नाही. करोनामध्ये त्याच्या पत्नीचं निधन झालं. त्यानंतर तो कुणाच्याही संपर्कात नव्हता. आता अभिनेता आशिष पवार याने त्याच्याबद्दल भाष्य केलं आहे.