MAHESH LIMAYE REVEALS ASHOK SARAF ICU STORY,
esakal
MAHESH LIMAYE REVEALS ASHOK SARAF ICU STORY: अशोक सराफ यांच्या कामाप्रती असलेल्या निष्ठेचा एक खास किस्सा सध्या चर्चेत आला आहे. अभिनेता अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांची प्रमुख भूमिका असलेला 'आदि अनंत' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आजोबा आणि नातवाच्या नात्यातील भावनिक गुंफण या सिनेमातून पाहायला मिळते. सिनेमातील कलाकारांचा अभिनय आणि कथानकाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दरम्यान अशातच सिनेमाचे दिग्दर्शक महेश लिमये यांनी अशोक सराफ यांचा एक किस्सा शेअर केलाय.