

ashok saraf on dada kondke
esakal
आपल्या चित्रपटातून समाजप्रबोधन करणारे लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक दादा कोंडके यांनी आपल्या विनोदाने प्रेक्षकांना पोट धरून हसवलं. मात्र त्यांच्या द्विअर्थी संवादांवर कायम टीका करण्यात आली. दादांचे चित्रपट तुफान चालले. त्यांची आणि अभिनेते अशोक सराफ यांचीही जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्या दोघांच्या जोडीचे 'पांडू हवालदार', 'तुमचं आमचं जमलं' आणि 'राम राम गंगाराम' हे तीन सिनेने तुफान चालले. मात्र त्यानंतर ही जोडी एकत्र दिसली नाही. दादा आणि अशोक मामा यांच्या काय बिनसलं याबद्दल नेमकं कुणालाही काही ठाऊक नव्हतं. मात्र आता मित्र म्हणेला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ यांनी त्यांनी दादांचे सिनेमे बदलल्यानंतर त्यांना स्वतः नकार दिल्याचं म्हटलं आहे.