एडिटरच्या बायकोला ३ डझन बांगड्या! संजू राठोडच्या 'लाल कलरची बांगडी'वर अशोक सराफ यांचा डान्स, व्हिडिओ वायरल

ASHOK MAMA DANCE ON LAL COLOR CHI BANGDI SONG: संजू राठोड याच्या गाण्यावर मराठी सिनेसृष्टीचे मामा अशोक सराफ नाचले तर? त्यांचा एका जुन्या गाण्याचा इडिटेड व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
ashok saraf dance on laal laal color chi bangdi

ashok saraf dance on laal laal color chi bangdi

esakal

Updated on

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं करणारे मराठी सिनेसृष्टीचे दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी अभिनय क्षेत्रात एक अढळ स्थान निर्माण केलंय. त्यांचे कित्येक चित्रपट ब्लॉकबस्टर ठरलेत. सचिन पिळगावकर असोत किंवा लक्ष्मीकांत बेर्डे कोणत्याही को-स्टारसोबत त्यांची चांगली गट्टी जमते. त्यांच्या अभिनयाला तोड नाही. मात्र नृत्यातही त्यांचा हात कुणी धरू शकत नाही. मात्र मामांनी जर संजू राठोडच्या 'लाल लाल कलरची बांगडी' या गाण्यावर डान्स केला तर? त्यांचं एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. चला पाहूया एडिटरने त्यांना कसं नाचवलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com