

ASHOK SARAF ON FATHER DEATH
ESAKAL
मराठमोळे अभिनेते अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यांनी आपल्या कामाला सर्वतोपरी मानलं म्हणूनच आज त्यांचं नाव मोठ्या अदबीने घेतलं जातं. मात्र या टप्प्यावर ते सहज पोहोचलेले नाहीत. आयुष्यातील महत्वाच्या घटनांमध्येही त्यांनी अभिनयालाच पहिल्या स्थानी ठेवलं. अगदी त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतरही त्यांनी आपल्या भावना दाबून ठेवल्या होत्या. लोकप्रिय कॅमेरामन आणि अलका कुबल यांचे पती समीर आठल्ये यांनी त्यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे.