

ashok saraf
esakal
मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. आपल्या अभिनयावर विश्वास ठेवून त्यांनी रसिकप्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र त्यांनी आयुष्यात खूप खाचखळगे पाहिलेत. खूप चढउतार पाहीलेत. अनेक संकटांचा सामना केलाय. त्यातलंच एक संकट म्हणजे खेड- शिवापूरला झालेला अपघात. ही अपघाताची घटना १९८७ मध्ये घडली. त्यानंतर सहा महिने मामा इस्पितळात होते. नुकतीच अशोक सराफ यांनी मित्र म्हणेला मुलाखत दिली. यात बोलताना त्यांनी या घटनेचा उल्लेख केला.