हे काही पटलं नाही... अशोक सराफांचं दादा कोंडकेंबद्दल 'ते' वक्तव्य; नेटकरी नाराज, म्हणतात- ते आता नाहीत म्हणून वाट्टेल ते...

Ashok Saraf Dada Kondke Controversy | Social Media Reactions to His Remark: अभिनेते अशोक सराफ यांनी दादा कोंडके यांच्यासोबत काम न करण्याचं कारण सांगितलं होतं. जे अनेकांना पटलेलं नाही. आता मामा खोटं बोलत आहेत असं मत अनेकांनी व्यक्त केलंय.
ashok saraf on dada kondke

ashok saraf on dada kondke

esakal

Updated on: 

मराठमोळे अभिनेते दादा कोंडके यांनी आपल्या अभिनयाने, लेखनाने आणि चित्रपटांनी मराठी सिनेसृष्टीचा इतिहास सुवर्ण अक्षरात लिहिला. त्यांचे सिनेमे तेव्हा तब्बल ५०- ५० आठवडे सिनेमागृहात ठाण मांडून असायचे. त्यांच्या सिनेमातील संवाद द्विअर्थी असल्याने त्यांच्यावर टीका झाली. मात्र त्यांचे चित्रपट वास्तववादी होते आणि आजच्या परिस्थितीवर परखड भाष्य करणारे होते. अभिनेते अशोक सराफदेखील त्यांच्या चित्रपटात होते. मात्र ३ सिनेमांनंतर त्यांनी एकत्र काम केलं नाही. मित्र म्हणेच्या मुलाखतीत मामांना यामागचं कारण विचारण्यात आलेलं. मात्र मामांनी जे कारण सांगितलं जे अनेक प्रेक्षकांना पटलेलं नाही. त्यांच्या दादा कोंडके यांच्याबद्दलच्या वक्तव्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केलीये.

Loading content, please wait...