

ashutosh rana on deepika padukone
esakal
गेल्या वर्षी दीपिका पादुकोणने आठ तासांच्या कामाच्या शिफ्टची केलेली मागणी चित्रपटसृष्टीत एक मोठं वादळ घेऊन आली. सुरुवातीला वैयक्तिक मत म्हणून मांडलेली ही भूमिका लवकरच ओशाळ मीडियावर गाजू लागली. अनेक अभिनेते, दिग्दर्शक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांनी सेटवर ठरलेल्या आणि संतुलित कामाच्या तासांची गरज असल्याचं सांगितलं. अनेकांचं मत होतं की कामाचे तास कमी असायलाच हवेत. त्यावर आता आशुतोष राणा यांनी दीपिकाच्या या मागणीवर आपलं मत व्यक्त केलंय.