

ashvini mahangade wedding location
esakal
छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी महांगडे कायम प्रेक्षकांमध्ये चर्चेत असते. 'आई कुठे काय करते' मधून घराघरात पोहोचलेली अश्विनी नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. तिने अभिनेता आणि कुस्तीपटू भूषण शिवतारे याच्यासोबत लग्नगाठ बांधलीये. मोठ्या थाटामाटात हा सोहळा पार पडला. त्यांनी सोशल मीडियावर हे फोटो शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. या सोहळ्याला त्यांचे जवळचे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी हजर होते. आता अभिनेत्रीने तिचे इतर सोहळ्याचे फोटो शेअर केलेत. सोबतच एक भावुक मेसेज देखील दिलाय.