ASHWINI GORLE TROLLED FOR BOLD PAITHANI DRESS
esakal
ASHWINI GORLE PAITHANI DRESS VIRAL VIDEO: मनोरंजनविश्वात सेलिब्रेटींनी केलेली स्टाईल, फॅशन चाहत्यांना प्रचंड आवडत असते. अनेक वेळा कलाकरांना चाहते कॉपी सुद्धा करतात. त्यांचा फॅशन सेन्स, कपडे घालण्याची पद्धत किंवा एखादा नवीन डिझाइन केलेला ड्रेस सगळं चाहत्यांना आवडत असतं. परंतु कधी-कधी कलाकारांचे कपडे असे असतात की, त्यांना ट्रोलिंगचा सुद्धा सामना करावा लागतो. अशाच तारिणी मालिकेतील अभिनेत्री अश्विनी गोरले हिला तिच्या कपड्यावरून ट्रोल करण्यात आलय. अनेकांनी तिच्या लूकवर नाराजी सुद्धा व्यक्त केली.