
Bollywood Entertainment News : गोलमाल, भूलभुलैया 2 यांसारख्या सिनेमांमध्ये आपल्या दमदार अभिनयामुळे सगळ्यांचं मन जिंकणारी मराठी अभिनेत्री अश्विनी काळसेकरने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. गंभीर असो वा विनोदी प्रत्येक भूमिका उत्तम साकारणाऱ्या अश्विनी यांनी आजवर हिंदी, मराठी, तामिळ आणि तेलुगू सिनेमात काम केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी मूल नसण्याबद्दल भाष्य केलं.