

prajakta gaikwad wedding reception entry
esakal
सध्या मराठी सिनेसृष्टीत लगीनसराई सुरू आहे. गेल्या काही दिवसात अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकलेत. यात लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड देखील काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकली. तिने शंभूराज खुटवडसोबत विवाह केला. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले. मात्र त्यांच्या रिसेप्शनच्या एन्ट्रीने सगळे अवाक झालेले. प्राजक्ता आणि शंभूराजने नंदीवरून एंट्री घेतली होती. नंदीच्या पुढ्यात भगवान शंकर त्यांच्या गणांसह नाचताना दिसले. त्यामुळे त्यांना ट्रोलही करण्यात आलं. आता प्रसिद्ध ज्योतिषाने ही एंट्री चुकीची नव्हती असं म्हंटल आहे.