

ASURVAN TEASER
ESAKAL
स्वप्नस्वरूप प्रस्तुत, बहुप्रतिक्षित ‘असुरवन’ या आगामी मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित होताच या चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. त्यानंतर नुकताच या चित्रपटाचा चित्तथरारक टीजर प्रदर्शित झाला आहे. 'कांतारा' आणि 'दशावतार' यासारख्या स्थानिक संस्कृतीवर आधारित चित्रपटांप्रमाणेच 'असुरवन' हा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला चित्रपट आहे. कमी कालावधीतच ‘असुरवन’ चित्रपटाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. वाघाच्या चित्राने रंगवलेला मुखवटा, अद्भुत जंगल आणि आदिवासी संस्कृतीची सांगड तसेच बॅकग्राउंड संगीतामुळे या सगळ्यातून चित्रपटात नेमकं काय पहायला मिळणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.