
आपल्या जीवनात अनेक अडचणी आणि समस्या निर्माण होत असतात. त्यातील एखादी अडचण किंवा समस्या चुरकीसरशी सुटते; परंतु एखादी समस्या वा अडचण सोडविण्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागते. अधिक कष्ट घेतले तसेच जिद्द आणि चिकाटी असली की आपण आपल्या ध्येयाप्रती निश्चित पोहोचू शकतो. त्याकरिता अधिक प्रयत्न आणि सकारात्मक विचार असणे आवश्यक आहे. दिग्दर्शक शिवराज वायचळने 'आता थांबायचं नाय' या चित्रपटातून हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. सगळ्यांना प्रेरणा देणारा आणि आपल्यामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करणारा आहे.