
Entertainment News : हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार रणवीर सिंग, बॉबी देओल आणि दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री श्रीलीला एका भव्य जाहिरात चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. या जाहिरातीचे दिग्दर्शन ‘जवान’ चित्रपटानंतर चर्चेत असलेल्या दिग्दर्शक अॅटली यांनी केले आहे. विशेष म्हणजे, या जाहिरात मोहिमेचा अंदाजे १५० कोटी रुपयांचा खर्च असल्याची चर्चा सध्या जोरात आहे.