
Marathi Entertainment News : सध्या टीआरपीच्या रेसमध्ये टिकून राहण्यासाठी प्रत्येक वाहिनी काही ना काही नवीन शो प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे . स्टार प्रवाह आणि झी मराठी वाहिन्यांमध्ये टीआरपीच्या रेसमध्ये आघाडीवर राहण्यासाठी शर्यत लागलेली पाहायला मिळतेय. झी मराठीवर देवमाणूस मधला अध्याय ही मालिका प्रसारित झाल्यानंतर नुकतीच स्टार प्रवाहने नवीन मालिकेची घोषणा केली. हळद रुसली कुंकू हसलं असं या नव्या मालिकेचं नाव आहे. मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला.