
lagnanantar hoilch prem
esakal
स्टार प्रवाहच्या मालिकांनी जणू प्रेक्षकांना गारुड घातलंय. टीआरपी यादीत स्टार प्रवाहच्या मालिकांचं वर्चस्व पाहायला मिळतं. या वाहिनीवरील प्रत्येक मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. 'ठरलं तर मग' असो किंवा 'तू ही रे माझा मितवा' प्रत्येक मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलंय, या मालिकांमधील कलाकारही प्रेक्षकांचे आवडते बनलेत. मात्र हे कलाकार बदलले तर त्या जागी नवीन कलाकार पाहण्यासाठी प्रेक्षक तयार होत नाहीत. मालिकेतील कलाकार बदलले की प्रेक्षकांना मोठा धक्का बसतो. अशाच एका लोकप्रिय कलाकारांविषयी सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.