
Marathi Entertainment News : सध्या मालिकाविश्वात अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही महिन्यात झी मराठी वाहिनीवर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आणि आगामी काळात प्रसारित होणाऱ्या नवीन मालिकांची घोषणा करण्यात आली. त्यातीलच एक मालिका म्हणजे इच्छाधारी नागीण. दिवाळीच्या सुमारास या मालिकेची घोषणा करण्यात आली होती. नुकताच या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला.