
Entertainment News : साऊथ इंडियन सिनेमाची क्रेझ सध्या सगळीकडे वाढत असताना आता एका आयपीएल विजेत्या कर्णधारालाही या इंडस्ट्रीची भुरळ पडली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आणि सनरायजर्स हैदराबादचा माजी खेळाडू असलेला डेव्हिड वॉर्नर आता साऊथ इंडियन सिनेमात पदार्पण करतोय. सोशल मीडियावर सिनेमाचं पोस्टर शेअर करत त्याने ही बातमी शेअर केली.