तुझ्या सारख्या सरळ माणसाचा ना हा धंदा... DJ ला विरोध करणाऱ्या बापटांसाठी अवधूत गुप्तेने बनवलं गाणं; व्हिडिओ व्हायरल

AVDHOOT GUPTE SONG ON VIDYANANAD BAPAT: डीजेला विरोध करणारे विद्यानंद बापट यांच्यासाठी लोकप्रिय गायक अवधूत गुप्ते याने खास गाणं बनवलं आहे जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
AVDHOOT GUPTE SONG ON VIDYANAND BAPAT

AVDHOOT GUPTE SONG ON VIDYANAND BAPAT

ESAKAL

Updated on

सध्या पुण्यात घडलेल्या एका घटनेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. पुण्यातील विद्यानंद बापट यांनी बैठकीत डीजेला विरोध केला होता. त्या बैठकीतून त्यांना अपमान करून बाहेर काढण्यात आलं होतं. त्यानंतर मात्र अनेक लोक त्यांच्याबाजूने पुढे आले. विद्यानंद यांना त्यांची भूमिका विचारण्यात आल्यावर त्यांनी आपला विरोध गणेशोत्सवाला नसून त्यात वाजणाऱ्या डीजेला आहे हे स्पष्ट केलं. त्यांच्या विचारांना पाठिंबा देणारे अनेक लोक पुढे आले. शिवाय त्यांच्या संस्कृत आणि मराठीवर असलेल्या प्रभुत्वाने सगळेच भारावून गेले. मात्र काही दिवसांपूर्वीच एका व्यक्तीने त्यांना भर मुलाखतीत मारहाण केली. त्यामुळे प्रचंड जनक्षोभ उसळला होता. आता या बापटांसाठी लोकप्रिय गायक, संगीतकार अवधूत गुप्ते याने खास गाणं तयार केलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com